पेट्रोल डिझेलची वाढ

Foto
पेट्रोल ऽ 85.72
 10 दिवसात पावणेसहा तर डिझेल 6 रुपयांनी वाढ 

गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. दिवसाकाठी 50 पैशापासून 1 रुपयांपर्यंत दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांना मात्र चांगलीच आर्थिक झळ सोसावी आहे. गेल्या दहा दिवसात पेट्रोलच्या किमतीत 5 रुपये 74 तर डिझेलच्या किमतीत 6 रुपये 13 पैशांची वाढ झाली आहे.
गेल्या तीन महिन्यापासून ठप्प असलेले जनजीवन 1 जून पासून सुरळीत होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसून येत आहे. पेट्रोल पंपावरही वाहनांच्या रांगा लागत आहेत. अशा परिस्थितीत आता पेट्रोल कंपन्यांनी दरवाढ करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसते. 7 जून रोजी पेट्रोलची किंमत 79. 98 एवढी होती. त्यात दररोज किमान 50 पैसे ते 1 रुपया अशी वाढ होत राहिली. आज पेट्रोलची किंमत 85 रुपये 72 पैशावर जाऊन पोहोचली आहे. डिझेलच्या किमतीतही दरवाढ होत आहे. 7 जून रोजी डिझेलची किंमत 69.87 पैसे होती. आज डिझेलची किंमत 76 रुपये एवढी झाली आहे.
सर्वाधिक वाढ 12 जून रोजी
दरम्यान, पेट्रोलच्या किंमतीत सर्वाधिक वाढ 12 जून रोजी झाली.  8 जून रोजी 80 रुपये 55 पैसे प्रति लिटर असलेले पेट्रोल 12 जून रोजी 80 रुपये 59 पैशावर जाऊन पोहोचले. या दिवशी सर्वाधिक 2 रुपये 4 पैशांची दरवाढ झाली होती. 14 जून रोजी 1 रुपये 15 पैसे एवढी दरवाढ झाली. 15 व 16 जूनला प्रतिदिन 46 पैसे,  17 ला 53 पैसे तर 18 जून रोजी 51 पैशांची दरवाढ पेट्रोलमध्ये नोंदविली गेली. डिझेलच्या किमतीत सर्वाधिक दरवाढ 14 जून रोजी नोंदवली. या दिवशी 1 रुपया 16 पैशांनी डिझेलचे दर वाढले. 12 जून रोजी 1 रुपये 12 पैशांनी, 15 जूनला  56 पैसे, 16 जुनला 48 पैसे दरवाढ झाली आहे.